धडपडणं हेच तर आयुष्य आहे....
धडपडणं हेच तर आयुष्य आहे....
हो कारण कधीकधी सगळं सहज मिळावं हिच अपेक्षा ठेवून माणूस जगतो....
पण ते आयुष्य नसतच कधी...
तो विरोधाभास असतो ...गरज नसलेला..
पण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जेव्हा मन सतत
प्रयत्न करत असतं ना तेव्हाच तर खरी जगण्याची
गम्मत समजते....
तेव्हाच कळतं कि काहीही होऊ शकतं ...
खूप चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं...
धडपड ...नाही आवडत काहींना ...
पण खर तर धडपडत जगण्यात जो जिवंतपणा आहे ......
तो आरामात राहून किंवा काहीच न करण्यापेक्षा नक्कीच चांगला आहे....
ती माणसंच झपाटलेली असतात ....ज्यांना चुकून. .पडून. ...रडून. ..तरीही जिद्दीनं उभं राहण्याची जाणीव असते...
धडपडणं हेच तर आयुष्य आहे....
कारण खूप जाणिवा माणसांत ह्या धडपडण्यामुळेच तर येतात....
कळत नकळत माणूस स्वतःलाच भक्कम करत असतो....
फक्त शरीराने नाही तर मनानेही.. कधी वेळेशी..कधी
संकटांशी ही अनोखी धडपड तो जगत असतो ...
आपलंच जगणं जवळून घडवत असतो.....
प्रत्येक माणूस धडपडतो....
धडपडतच आयुष्याचा प्रवास सुरेख करतो...
चालत राहतो संयमाने. .
शोधत राहतो कणखर मार्ग...
आपली पावलं आत्मविश्वासाने ठेवतो...
जगायला शिकतो उघड्या डोळ्यांनी. ..
आपलं व्यक्त होणं सक्षम करतो...
एक समंजस दृष्टीकोन जगू लागतो...
मग एक दिवस मनाला धडपडणच आवडायला लागतं.....
आणि आपलं आपल्यालाच कळत,
धडपडणं हेच तर आयुष्य आहे....!
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
English translation :
Life is a struggle ....
Stumbling is life ....
Yes, because sometimes a person lives with the expectation of getting everything easily ....But that life is never ...
It's a paradox ... not necessary.
But the mind constantly when to get something
Trying to really survive
Funny understands ....
Only then do you realize that anything can happen ...
A very good life can be lived ...
Stumbling ... some don't like ...
But in fact, the liveliness in living a struggling life ......
It is definitely better than relaxing or doing nothing ....
Those people are rushed .... who are mistaken. .Fallen. ... crying. ..But still is aware of standing stubbornly ...
Stumbling is life ....
Because a lot of conscious people come because of these struggles ....
Unknowingly, a person is strengthening himself ....
Not only physically but also mentally .. sometimes with time..sometimes
He is living this unique struggle with crises ...
Our own life is closely shaped .....
Every man stumbles ....
Struggling makes life's journey beautiful ...
Keeps walking with restraint. .
Keeps up the good content ...
Keeps your footing confident ...
Learns to live with open eyes. ..
Enables your expression ...
A sensible approach begins to live ...
Then one day the mind starts liking the beating .....
And we know ourselves,
Stumbling is life ....!
-@kunal vijay Thakare.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा