छोट्या छोट्या गोष्टी ....😍💛💛
छोट्या छोट्या गोष्टीच माणसाला घडवतात...
कधी कधी जाणिवां समृद्ध करतात..
आपल्या नकळत आपलं असणं सुंदर करतात..
खूप मोठं काही तरी करण्यासाठी आधी लहान गोष्टींचं
भान ठेवावं लागतं..
लहान चुकांतूनही आयुष्य जगायला पुरतं...
कधी सगळंच केलेलं सहज वाया जातं ...जेव्हा ह्या लहान गोष्टी विसरल्या जातात..
एकमेकांची समज काढतात लोकं..जेव्हा हे बारकावे
दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक गोष्टी हातून सुटतात...
ह्या लहान गोष्टीच मनाला आनंद देउन जातात..तर कधी खूप समजूतदार बनवतात...
नेहमी काहीतरी नवीन करताना हे बारकावेच शहाणं करून जातात....
छोट्या छोट्या गोष्टी असतात वागण्यातल्या, आपल्या
मनातल्या ज्या कधी जाणिव ...कधी चुका..कधी नियम .कधी परीक्षा. ..कधी अपेक्षा. .कधी कर्तृत्व. .अशा अनेक गोष्टी सहज माणसाला नवीन जन्म देतात....
आपल्याच मनाला जास्तीत जास्त संयमी बनवतात..
वेळेनुसार ह्या लहान गोष्टी जो जगतो ....लक्ष देऊन
जो पुढे जात राहतो ...तोच खरा भाग्यवान माणूस असेल ...कारण त्याला कळतं.. कि का आपण आयुष्यातल्या प्रत्येक लहान गोष्टीकडे बघावं...
म्हणून वाटतं ...कुठल्याही परिस्थितीत ह्या लहान गोष्टींना. .क्षणांना भरभरून जगता यावं..
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
English translation:
Little things ....
Little things make a man ...
Sometimes they enrich the consciousness.
They make our being beautiful without our knowledge.
Small things first to do something very big
You have to be aware ..
Even small mistakes are enough to live life ...
Sometimes everything is easily wasted ... when these little things are forgotten ..
People understand each other..when this is detailed
Many things get lost due to neglect ...
These little things make the mind happy..sometimes they make you very understanding ...
They are always wise to do something new ....
There are small things in your behavior
Sometimes I realize ... sometimes mistakes..some rules. Sometimes exams. ..Sometimes expected. .Kadhi Kartartva. Many such things easily give birth to a new person ....
Make your own mind as restrained as possible.
By living these little things over time .... by paying attention
The one who keeps moving forward ... will be the real lucky person ... because he knows .. why we should look at every little thing in life ...
So I think ... in any case, these little things. .Let's live the moments to the fullest ..
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
-@kunal vijay Thakare .


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा