गुलाब.....
काट्यात आहे त्याचे सारे आयुष्य गुंफलेले. ..
तरीही किती उत्साहाने फुलणे जिवंत आहे...
आत्मविश्वासाने उमलणे त्याचे क्षणाक्षणाला सुरुच
आहे.....
रंग वाटतो मोहक त्याचा बाहेरून. .....
आतल्या वेदनांचा साक्षीदार तो एकटाच आहे....
पाकळ्या लपेटून रहस्यांच्या कसा सुंदर दिसतो आहे......
आकर्षून घेतो मन सहज फुलपाखरांचं ...
जगण्याचं मूळ मात्र समजून घेत आहे...
काय होईल पुढे हे नाही मनात त्याच्या ...
अपेक्षाही नाहीत कोणाकडून ..
तरीही कुंडित आपलं अस्तित्व जपतो आहे..
सकारात्मकतेच्या देठा-पानांनी नव्याने बहरतो आहे...
इतरांच्या आनंदात. ...स्वतःहून समर्पित होतो आहे...
कोणासाठी शोभा...कोणाचं तरी प्रेम म्हणून मिरवतो आहे.....
दोषही प्रेमाचा तोच झेलतो आहे...
खिडकीमधून गडद रंगात डोकावून बघतो आहे...
काट्यातही त्याच्या मायाच दिसते .....
स्वतःच्या तुटण्याची त्याला जाणीवच नसते...
कळी पासून फुलं ...एवढाच प्रवास नसतो त्याचा...
तो तर आव्हानांनाही आपलंसं करतो...
इतरांना तो फक्त उपयोगीच वाटतो...
निर्लजांना तो सहज रक्तबंबाळ करतो...!
सच्चा असतो ना आपल्या जागी ....
तरीही जगावेगळा वाटतो आहे....
जिवन-मरणापलीकडचा प्रवास तो सतत सार्थ ठरवत आहे.....
कोणाच्यातरी मनात समाधान. ..प्रेम..त्याग..विद्रोह...प्रेरणा ...
जागवत आहे...
तो गुलाब आहे....वेडा...पण मस्त 😍....
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Rose .....
His whole life is wrapped up in thorns. ..
Yet with so much enthusiasm the bloom is alive ...
It continues to boil over with confidence
Is .....
The color feels seductive from the outside. .....
He is the only one to witness the inner pain ....
How beautiful it looks with wrapped petals ......
The mind easily attracts butterflies ...
Understanding the origin of life ...
What will happen next is not in his mind ...
No expectations from anyone ..
Still, is preserving his existence.
The stalks of positivity are blossoming anew ...
In the joy of others. ... is dedicating itself ...
Beauty for someone ... is walking as someone's love .....
The same guilt is borne by love ...
Peeking out of the window in a dark color ...
His love can be seen even in thorns .....
He is not aware of his own breakdown ...
Flowers from the bud ... not so much the journey ...
He even accepts challenges ...
Others just find it useful ...
He easily bleeds the shameless ...!
Is it true or not in your place ....
Still the world feels different ....
He is constantly making the journey beyond life and death meaningful .....
Satisfaction in someone's mind. ..Love..sacrifice..rebellion ... inspiration ...
Waking up ...
he is the cute rose😍.
-@kunal vijay Thakare.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा