मनातल्या मनात......😊
आपल्याच भावनांचा हा कसा खेळ आहे...
अपेक्षा इतरांकडून असतात नेहमीच ....
दोषाला पात्र वेळ आहे...!
अंधारात आहेत स्वतःचेच विचार...
नशिबाला दोष देणं बिनधास्त सुरू आहे....
उद्याची काळजी असते सतत..
आज मात्र उगाचच वाया जात आहे....
नकारात्मकतेची बीजं रोवणं सुरूच आहे....
सकारात्मकता फक्त बोलण्यातच व्यस्त आहे....!
दिखाउपणाच्या हद्दी मोडून पुढे चालले सर्व. ..
खरेपणाचे आरसे दिसतात धूसर झालेले...!
जळता जळता इतरांवर ..खोटं हसू दाखवणं सुरू आहे....
स्वतःचीच स्वतःशी कशी ही चढाओढ आहे....
स्वप्न उत्साहाने बघितलेली ...तुडवणं सुरू आहे...
जिद्दी पावलांची घौडदौड तुफान सुरू आहे....
जगण्याची भाषा बदलता बदलता...
मनातल्या मनात धडपडणं सुरू आहे...!
दिसण्या -असण्यातला संघर्ष. .वारंवार जाणवून देणं सुरू आहे....
परिस्थिती आणि माणसांनी हे आयुष्य सुंदर आहे...!
जगावेगळा असा प्रत्येकाचा बेभान प्रवास
सुरू आहे.....
क्षणाक्षणाला मनाची घालमेल..कधी स्वभावाची
स्वभावाशीच नवीन कसरत ...तर कधी जाणिवांच्या
कचाट्यातूनही संयमाने चालणं सुरू आहे...
खरंच रंगीबेरंगी आयुष्याला पुन्हा पुन्हा समजणं सुरू आहे.....
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
In between the mind ......
How is this game of your emotions ...
Expectations are always from others ....
It's time to blame ...!
Your own thoughts are in the dark ...
Blaming fate continues unabated ....
The worry of tomorrow is constant ..
Today, however, it is being wasted ....
The seeds of negativity continue to be sown ....
Positivity is just talking ....!
All proceeded to break the boundaries of appearances. ..
The mirrors of reality look dim ...!
Burning burns on others..false smiles are starting to show ....
How this is a struggle with oneself ....
Enthusiastically dreaming ... continues to tread ...
The hurricane of stubborn steps is starting ....
Changing the language of life ...
My heart is pounding ...!
The struggle to be seen. It is becoming more and more noticeable ....
This life is beautiful by circumstances and people ...!
Everyone's unconscious journey to a different world
In progress
Every now and then the mind gets confused..sometimes of nature
A new exercise by nature ... if ever conscious
I am walking with restraint even after the quarrel ...
Really colorful life is beginning to be understood again and again .....
-@kunal vijay thakare.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा