रेशमी बंध हे......
कधीच न कळावे ....तरीही गोड वाटावे...
सतत उलगडत जावे....इंद्रधनुष्यासारखे....
भाबड्या मनाचे रूप नव्याने दिसावे...
वचनांपलीकडेही नाती बहरावी....
प्रेमाने सावरलेली मनं दिसावी...
एकमेकांसाठी जीवही दिसावा..कासावीस झालेला...
डोळ्यांतल्या आसवांनाही सावरणारी आसवं असावी...
आनंद एकमेकांच्या असण्याचा सतत टिकून रहावा...
सोबत एकमेकांची सदैव रहावी ...सावलीसारखी...
न बोलताही मन समजून घ्यावं ...सहज....
दिसण्या-असण्यापलीकडे असंही नातं जपावं....
कमी-जास्त...मोठ्ठं लहान कोणी नसावं....
खरेपणाने फुलवता यावा हा प्रवास..
सतत जगावासा वाटावा हा वेगळा सहवास...
घट्ट टिकून रहावे हे बंध प्रेमाचे...
सूर सापडावे सुंदर नात्यांचे...
शरीर- मना पलीकडची ओढ अनोखी जिवंत रहावी...
रेशमी बंधातली ही गोड नाती चिरंतन व्हावी...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
-@कुणाल विजय ठाकरे .

वाह....! कुणाल.
उत्तर द्याहटवा🙏Thanks bro😍
हटवा